मंत्रयुद्ध तो आला नव्हता त्याला आणला होता🔥🔥
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=5aKrDGgxv74
“ तो आला नव्हता त्याला आणला होता “ म्हणजेच महाराजांनी बुध्धिचातुर्याने खानाला जावळीमध्ये खेचुन आणला होता. पण या कामात सर्वात मोलाची कामगिरी कोणी बजावली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील ज्यांना सर्व पंताजीकाका अस म्हणतं. जेव्हा खानाने पहिल्यांदा त्याचा वकील कृष्णाजी भास्कर याला महाराजांकडे बोलाचाली करण्यासाठी पाठवलं तेव्हा जवळ जवळ खानाने शिवरायांच्या गुन्ह्यांचा पाडा वाचुन शिवरायांना जावळी परत देणे आणि वाईस भेटायला येणे अस सांगितल होत. त्यानंतर महाराजांनी पंताजीकाकांना खानाकडे पाठवुन असे सांगितले की आम्ही भेटीस तर तयार आहोत आम्ही काकांची भेट घेऊ म्हणजे महाराज इथे खानाला मुद्दाम काका म्हणत आहेत आमच्या मनात काहीच कपट नाही .पंताजी काका सुद्धा मुद्दाम खानाला म्हणाले जसे शहाजी राजे तसेच आपण . राजा तुम्हास भितो. म्हणुन वाईस भेटीस येत नाही. थोडक्यात महाराज खानाच्या सर्व अटी मान्य करायला तयार होते फक्त भेटीसाठी खानाने जावळीत यावे अशी महाराजांची स्पष्ट भुमिका होती. त्यानंतर खानाने काय उत्तर दिले याचे पुरावे आपल्याकडे नाही . परंतु पंताजीकाका दुसऱ्यांदा खानाला भेटण्यास वाईला आले आणि पुन्हा म्हणाले की, राजा खचला आहे, वाईस भेट घ्यायला मनात शंका येते.तुम्हीच येथे जावळीस येणे आणि भेट घेऊन बरोबर घेऊन जाणे सोबत सैन्य घेऊन यावे . पंताजीकाका खानाच्या मनाचेच बोलले. खान म्हणाला “राजा हरमजादा काफर. जावळी बिकट जागा. तिकडे आम्हाला भेटीस बोलवितो.तू ब्राह्मण आहेस तू शपथ देशील तर भेटीस येईन. महाराजांनी काकांना सांगुनच पाठवलं होत की हरप्रकारे खानाला खेचुन जावळीत आणणे. पंतजींनी लगेच शपथ दिली. आणि खान जावळीत यायला तयार झाला. पण खानाला कुठे ठाऊक होत महाराजांनी एक वेगळाच डाव मांडलेला. • संदर्भ - १) सभासद बखर • २) श्री शिवभारत • #pratapgad #maharashtra #raigad #shivajimaharaj #girgaonshobhayatra #sambhajimaharaj #maratha #rajgad #pune #marathi #satara #mumbai #shivneri #maharashtradesha #sahyadri #nashik #ig #kolhapur #manase #ajitdada #pmc #ajitdadapawar #zbridge #kalanagar #rajthakare #deccan #lullanagar #bandrawest #bandrabandstand #agentjacksmumbai
#############################
![](http://youtor.org/essay_main.png)