Mahatma Jotirao Phule Jan Arogya Yojana 2021 MJPJAY महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=Y0G1UzwACIs
या व्हिडीओमध्ये Mahatma Jotirao Phule Jan Arogya Yojana 2021 या योजनेविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. #mjpjay #JanArogyaYojana • आमचा संपर्क: • ------------------ • आमच्याशी संपर्क करा Facebook वर- / maze-sarkar-105830571599581 • ------------------------------------------------→ • आमच्याशी संपर्क करा Telegram वर- https://t.me/MazeSarkar • ------------------------------------------------→ • आमच्याशी संपर्क करा Instagram वर- / sarkariyojanamh • ////////////////////////////// • Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY) आणि Ayushman Bharat-Pradhan Mantri Jan Arogya Yojana (AB-PMJAY) दोन्ही योजना एकत्रित स्वरुपात लागू केल्या आहेत. २३ मे २०२० रोजीच्या शासन निर्णया नुसार कोरोन साथीच्या अनुषंगाने राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अंगीकृत दवाखान्यांमध्ये कॅशलेस आरोग्य सुविधा पुरवण्याचा सरकारचा मानस आहे. आजच्या व्हिडीओमध्ये आपण महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेच्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. • 1. योजनेचे पात्रताधारक कोण? • 2. आवश्यक कागदपत्रे कोणती? • 3. लाभार्थ्याला मिळणारे फायदे कोणते? • 4. कव्हरेज (समाविष्ट उपचार) कोणते? • 5. अर्ज कोठे करावा. • मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करा शेअर करा, आणि चानेल वर नवीन असल्यास अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चानेल ला सबस्क्राइब नक्की करून ठेवा. • महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना हि महाराष्ट्र सरकारकडून चालवण्यात येणारी आरोग्य योजना आहे. या योजनेद्वारे लाभार्थ्याला कॅशलेस आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. हि योजना सरकारी आणि खाजगी रुग्णालयांत सुद्धा उपलब्ध असते. हि योजना 2 जुलै 2012 रोजी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने 8 जिल्ह्यांसाठी सुरु झाली. आणि 21 नोव्हेंबर 2013 पासून 28 जिल्हायांसाठी लागू करण्यात आली. • 1 एप्रिल 2000 रोजी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्रितपणे लागू करण्यात आल्या. युनायटेड ईंडीया इन्शुरन्स कंपनी हि पब्लिक सेक्टर कंपनी फक्त 797 रुपयांच्या वार्षिक हप्त्यामध्ये एका कुटुंबाला आरोग्य सेवा पुरवते. मित्रांनो आपण पुढे पाहणार आहोत कि यामध्ये कोणते आजार कव्हर होतात. • 1. योजनेचे पात्रताधारक कोण? • या योजनेच्या पात्रता निकषांमध्ये तीन श्रेणी आहेत. • 1 ली श्रेणी • ज्या लोकांकडे पिवळे राशन कार्ड, अंत्योदय अन्न योजना राशन कार्ड, अन्नपूर्णा राशन कार्ड आहे त्या सर्वांना हि योजना लागू आहे. नारंगी राशन कार्ड धारक सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत पण त्यांचे उत्पन्न 1 लाखाच्या आत असावे. हे सर्व लोक पहिल्या श्रेणीमध्ये येतात. • 2 री श्रेणी • दुसऱ्या श्रेणीमध्ये औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम वर्धा. या चौदा जिल्ह्यांतील पांढरे राशन कार्ड धारक येतात. • 3 री श्रेणी • तिसऱ्या श्रेणीमध्ये शासकीय अनाथाश्रम, आश्रमशाळा, महिला आश्रमातील महिला कैदी, शासकीय वृद्धाश्रमातील वृद्ध, DGIPR द्वारे स्वीकृत केलेले वृत्तपत्रकारांचे अवलंबित कुटुंब. आणि नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंब हे सर्व लोक तिसऱ्या श्रेणीमध्ये येतात. • 2. आवश्यक कागदपत्रे कोणती? • पहिल्या श्रेणी मधल्या लाभार्थ्यांकडे पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा आणि नारंगी राशन कार्ड असावे आणि त्यासोबतच इतर एखादे फोटो ओळखपत्र असावे. फोटो ओळखपत्रांमध्ये बरेच ओळखपत्र आहेत जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, याशिवाय बरेच पुरावे आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला आमच्या telegram चानेल वर मिळून जाईल. • दुसऱ्या श्रेणी मधल्या लोकांकडे राशनकार्ड, सातबारा उतारा, आणि फोटो ओळखपत्र असावे. • तर तिसऱ्या श्रेणीमध्ये ओळखीचा पुरावा म्हणून कोणतेही फोटो ओळखपत्र, आणि हेल्थकार्ड असावे. • 3. लाभार्थ्याला मिळणारे फायदे कोणते? • महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य या योजने अंतर्गत 34 प्रकारच्या वैशिष्ट्यांमध्ये तब्बल 996 प्रकारच्या आजारांवर उपचार आणि शास्रक्रिया यांचा समावेश होतो. यांमध्ये प्रामुख्याने जळणे, हृदयविकार, त्वचाविकार, सामान्य शास्रक्रिया, रक्तदाब, संसर्गजन्य रोग, बालरोग, स्रीरोग, नेत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, संधिवात, मूत्ररोग, मानसिक विकार आणि याशिवाय अनेक उपचारांचा समावेश होतो. • मित्रांनो या पॅकेज मध्ये एडमिट केल्यापासून बेड चार्ज, नर्सिंग चार्ज, सर्जन चा चार्ज, ऑक्सिजन, ICU चार्ज, औषधांचा खर्च, X-Ray आणि इतर चाचण्या, इत्यादी पूर्ण खर्च डिस्चार्ज मिळेपर्यंत समाविष्ट होतो. आणि हे सर्व कॅशलेस असते. • याशिवाय जर एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर पार्थिव शरीर त्याच्या घरापर्यंत पोहचवण्याचा खर्च सुद्धा या पॅकेज मध्ये समाविष्ट आहे. मित्रांनो असे खूप फायदे या योजनेतून रुग्णाला मिळतो. • 4. कव्हरेज (समाविष्ट उपचार) कोणते? • मित्रांनो या योजनेंतर्गत लाभार्थ्याला तब्बल 1,50,000 रुपयांपर्यंत प्रत्येक वर्षी दवाखान्याचा खर्च मिळतो. त्याचबरोबर, मूत्रपिंड बदलण्याच्या शास्र्क्रीयेमध्ये 2,50,000 रुपयांपर्यंत दवाखान्याचा खर्च लाभार्थ्याला मिळतो. • 5. अर्ज कोठे करावा. • मित्रांनो ज्या लोकांना अर्ज करायचा आहे त्या लोकांनी अंगीकृत रुग्णालयाशी संपर्क करावा. तेथे असलेल्या आरोग्यामित्रांना भेटून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्याचबरोबर परिसरातील आरोग्य शिबिरामध्ये जाऊनही अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता. फक्त जाताना आपले ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जावे. • मित्रांनो 23 मे च्या शासननिर्णयानुसार राज्यातील सर्वच नागरीकांना या योजनेमध्ये समाविष्ट केलेले आहे.
#############################
