या वर्षीची आंगणेवाडी जत्रा भराडीदेवी Anganewadi सिंधुदुर्ग कोकण
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=jyeB6HeUovs
या वर्षीची आंगणेवाडी जत्रा | भराडीदेवी - Anganewadi सिंधुदुर्ग (कोकण) • या वर्षीची आंगणेवाडी जत्रा | भराडीदेवी - Anganewadi सिंधुदुर्ग (कोकण) • मित्रांनो या वर्षी मी आपल्या तळकोकणातील भराडीदेवीच्या जत्रेला आंगणेवाडी, मालवण येथे गेलो होतो. भराडी देवीची जत्रा म्हणजे कोकणकरवासीयांसाठी आनंदयात्रा असते. नवसाला पावणारी हि भराडी देवी हिच्या दर्शनाला कोकणातील चाकरमानी खास मुंबई आणि इतर शहरातून आंगणेवाडी, मालवण कडे येत असतो. या जत्रेचे विशेष म्हणजे जत्रेची तारीख आंगणे कुटुंबीय देवीला कौल लावून ठरवली जाते. देवीसाठी रानात पारध काढून (डुकराची शिकार) केली जाते आणि मग देवीच्या जत्रेचा दिवस ठरतो. जत्रेची तारीख ठरताच, देवीच्या सर्व भक्तांची गाड्यांची तिकीट काढायची लगबग सुरु होते. कोकणातील सर्वात मोठी जत्रा म्हणजे आंगणेवाडी भराडीदेवीची जत्रा असा नावलौकिक आहे. परंपरेनुसार चालत आलेल्या या जत्रेला दरवर्षी भक्तांची तेवढीच गर्दी असते. #AnganewadiJatra #BharadiDevi #MalvanKokan #sforsatish • या जत्रेमध्ये मालवणचा सुप्रसिद्ध खाजे खरेदी केले जातात. बरीच दुकाने जत्रेमध्ये लागलेली असतात. २ दिवस चालणाऱ्या जत्रेमध्ये लोक रात्र - दिवस देवीच्या दर्शनासाठी येत असतात. कोणी नवस फेडण्यासाठी येतो तर कोणी देवीकडे नवस करण्यासाठी येत असतो. देवीचा नवसाला पावणारी देवी असा भराडी देवीचा नावलौकिक आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये भराडीदेवीची, आंगणेवाडी जत्रा दाखवली आहे.विडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. • मी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आहे. • Facebook • / koknatlamumbaikar • Instagram • / koknatlamumbaikar
#############################
![](http://youtor.org/essay_main.png)