आलेपाक । आल्याची वडी । Alepak Recipe Alyachi Vadi Recipe Winter Recipes
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=tGue-Spt8QY
अधिक माहितीसाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा - • https://tinyurl.com/yfwekm68 • Ingredients: • आलं - अंदाजे ६-७ इंच मोठा तुकडा • दूध - ३ टेबलस्पून • साखर - आल्याच्या पेस्टच्या तिप्पट (खालील कृति पहा) • तूप - ताठलीला लावायला थोडेसे • Instructions: • आलं तासभर पाण्यात भिजवून ठेवा. • सालं-काढण्याने त्याची सालं काढून घ्या. • त्याचे साधारण एक एक इंच मोठे तुकडे करून घ्या. • दूध घालून त्याची मिक्सर मधे पेस्ट करून घ्या. • ही पेस्ट मोजून बाजूला ठेऊन द्या. • आल्याच्या पेस्टच्या तिप्पट साखर मोजून घ्या. • एका ताठलीला थोडे तूप लाऊन तयार ठेवा. • कढईमध्ये दूध-आल्याची पेस्ट आणि मोजून घेतलेली साखर घालून मध्यम आचेवर सतत हालवत शिजायला ठेवा. • हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. • जेंव्हा हे मिश्रण चांगले घट्ट होईल आणि हालवायला जड जाईल तेंव्हा गॅस बंद करून तूप लावलेल्या ताठलीत ओता. • पूर्ण गार झाल्यावर छोट्या छोट्या (अंदाजे एक इंच मोठ्या) वड्या कापून घ्या.
#############################
