नृसिंह सरस्वती karanjalad nrusihasaraswatinarsobawadi
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=za4pfDCrZ8E
नृसिंह सरस्वती #karanjalad #nrusihasaraswati#narsobawadi • जन्म: लाडाचे कारंजा, पौष शुद्ध इ. स. १३७८ • आई/वडिल: आंबामाता / माधव • वेष: संन्यासी • मुंज: इ. स. १३८५ • गुरु: कृष्णसरस्वती • संन्यास: इ. स. १३८८ • तिर्थाटन: इ. स. १३८८ ते १४२१ • औदुंबर चातुर्मास: इ. स. १४२१ • नरसोबावाडी: इ. स. १४२२ ते १४३४ • गाणगापुर: इ. स. १४३५ ते १४५८ • कार्यकाळ: इ.स. १३७८ ते १४५८ • निजानंदीगमन: इ. स. १४५८ • विशेष: दत्तावतार, धर्मसंस्थापनेचे कार्य चरित्र ग्रंथ, श्री गुरुचरित्र • शिष्यपरंपरा: • १) माधव सरस्वती • २) बाळसारस्वती • ३) कृष्णसरस्वती • ४) उपेंद्र माधव सरस्वती • ५) सदानंद सरस्वती • ६) ज्ञानज्योति सरस्वती • ७) सिद्ध सरस्वती • विश्वाव्यापक तूंचि होसी । ब्रम्हा विष्णू व्योमकेशी ।। धरिला वेष तू मानुषी । भक्तजन तारावया ।।१०।। • श्री गुरुदेव दत्त हा परमेश्वराचा ‘अनंत कालाचा अनंत भावाचा । अनंत जीवाचा कनवाळू’ अवतार आहे. ‘नाश कल्पान्तीही असेना’ असा हा अवतार आहे. ‘नाना अवतार होऊनिया गेले । दत्तत्व संचले जैसे तैसे ।’ अशी या अवताराची थोरवी प्रज्ञाचक्षू गुलाबमहाराज वर्णन करतात. हा अवतार ‘भोगमोक्षसुखप्रद:’ आहे. • श्रीपाद श्रीवल्लभ हा श्रीदत्तप्रभूंचा दुसरा अवतार. ‘कलौ श्रीपाद श्रीवल्लभ:’ अशी या अवताराची ख्याती आहे. श्रीनृसिंह सरस्वती हे श्रीदत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तरावतार आहेत. तेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्धी पावले. • श्रीनृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या पुराणप्रवाहात संजीवन ओतण्याचे कार्य श्रीनृसिंह सरस्वतींनी केले. समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले. • श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार काल शके १३०० ते १३८० (इ.स. १३७८ ते १४५८) असा आहे. श्रीगुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य, प्राणप्रिय ग्रंथ आहे. प्रापंचिकांचा आणि पारमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे. या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत. श्री नृसिंह सरस्वती. श्री गुरूचरित्रात अध्याय ११ ते ५१ या अध्यायात त्यांचे समग्र लीलाचरित्र आलेले आहे. श्री नृसिंह सरस्वती संन्यासधर्माचे सर्वोत्तम आदर्श होते. • ईश्वर-निष्ठदाम्पत्य श्री शिवोपासनेत मग्न असतानाच श्रीदत्तप्रभूंनी वचन दिल्याप्रमाणे पौष शुद्ध द्वितीयेला, शनिवारी माध्यान्हकाळी त्यांच्या पोटी सुपुत्र रूपाने अवतार धारण केला- हेच श्री नृसिंह सरस्वती होत. • जन्म होताचि ते बालक । ॐ कार शब्द म्हणतसे अलौकिक • पाहून झाले तटस्थ लोक । अभिनव म्हणोनि तये वेळी ॥ • जन्मताच ते ॐचा जप करू लागले. सर्वसामान्य मुलाप्रमाणे रडले नाहीत. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. तत्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वरावतार असल्याचे सांगितले. हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप, ताप, दैन्य हरण करणारा होईल म्हणून याचे नाव ‘नरहरी’ असे ठेवावे असे त्यांनी सुचवले. • याच्या स्पर्शाने आईच्या स्तनांतून अमाप दूध स्रवत असे. कौतुकात बाळ वाढू लागले. पण वय वाढत चालले तरी ॐकाराखेरीज कोणताच शब्द त्याला बोलता येत नसे. हा मुलगा मुका निघणार की काय ? अशी शंका आली. सात वर्षांपर्यंत बाळाने दुसरा शब्दच कधी उच्चारला नाही. त्याच्या मुंजीचा बेत ठरला. पण हा कुमार मंत्रोच्चार कसा करणार, म्हणून सर्वांना काळजी होती. बाळाने नाना चमत्कार करून दाखविले. लोखंडाला हात लावताच त्याने बावन्नकशी सोने करून दाखविले. मुलाचे समार्थ्य प्रत्ययास येऊन • ‘तूं तारक शिरोमणी । कारणिक पुरुष कुळदीपक ॥ तुझेनि सर्वस्व लाधलें । बोलतां आम्हीं नाहीं ऐकिलें । अज्ञानमायेनें वेष्टिलें । मुकें ऐसें म्हणों तुज ॥’ (११.५७-५८) • अशी कबुली मातेने दिली. • यथाविधी नरहरीचा व्रतबंध करण्यात आला. गायत्री मंत्राची दीक्षा घेऊन कुमार मातेजवळ भिक्षेसाठी आला. या वेळी बाळाने ऋग्वेदातील मंत्राचा स्पष्ट उच्चार केला, ‘अग्निमीळे पुरोहितं’ या मंत्राचा उच्चार ऐकताच सर्वांना नवल वाटले. यजुर्वेद, सामवेद म्हणून बाळाने सगळ्या लोकांना चकित केले. हा कुमार अवतारी पुरुष असल्याची खात्री सर्वांना पटली. मातेला बाळाने एक भिक्षा मागितली, ‘निर्धार राहिला माझिया चित्ता । निरोप द्यावा आम्हां त्वरिता । जाऊं तीर्थे आचरावया ॥’ (११.८३) वेदाभ्यास करण्यासाठी सर्वत्र संचार करण्याचा बाळाचा मानस पाहून मातापित्यांस दु:ख झाले. पुत्र रक्षक होईल, या आशेवर जगलेल्या मातेची निराशा झाली. आईचे दु:ख ओळखून मुलाने तिला ब्रह्मज्ञान सांगितले. तिला आणखी चार पुत्र होतील असे आश्वासन दिले आणि पूर्वजन्माची स्मृती करून दिली. त्याबरोबर ‘श्रीपादश्रीवल्लभ स्वरूपता । दिसतसे तो बाळक ॥’ (११.९३) या श्रीपादरूपी नरहरीला ओळखून मातेने बालकाचे चरण धरले. • मुंजीनंतर ते लवकरच तीर्थयात्रेला निघाले. पण वत्सल मातेच्या आग्रहास्तव ते एक वर्ष करंज ग्रामातच राहिले. मातेला आणखी दोन सुपुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर ते श्री क्षेत्र काशीला निघाले. प्रयाणकाली त्यांनी मातेला त्रैमूर्ती दत्त-स्वरूपात दर्शन देऊन पूर्वावतारातील श्रीपाद श्रीवल्लभ आपणच असल्याचे दाखवून दिले. स्मरण करशील त्यावेळी मी तुला दर्शन देईन असे आश्वासन देऊन ते श्री क्षेत्र काशीला निघाले. • #nrusihasaraswati #swamisamarthasevakendraakola, #shriswamisamarthamaharajkijai#samartha, #bramhandnayak#gurumauli #shripadshrivallabha #akkalkotswamisamarthmaharajkijai #shriswamisamarth#dattaguru • #gaurav vadnere #karanja lad • 👉 मी दिलेली माहिती माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या अध्यात्मिक ज्ञान 199 या युट्युब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 👈 • 👉 / @adhyatmikgyan199 • || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ||
#############################
